March 22, 2025

रणभूमीतला सगळ्यात मोठा शस्त्र, —संयम

Read Time – 3 Minutes

मोठमोठ्या विजयासाठी नेहमी ताकदच लागते असं नाही.
कधी कधी जिंकण्यासाठी — आणि टिकून राहण्यासाठी —एक पाऊल मागे घेणंही तितकंच आवश्यक असतं.

इ.स. १६६०, छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर वेढ्यात अडकले होते.
सिद्दी जौहरच्या सैन्याने चारही बाजूंनी वेढा घातला. रसद कमी पडत चालली होती, आणि थेट लढाई शक्य नव्हती. अशा वेळी महाराजांनी वेगळी रणनिती आखली.

महाराजांनी प्रत्यक्ष लढण्याऐवजी युक्तीचा वापर केला.
प्रथम, आपल्या विश्वासू माणसाला स्वतःच्या वेषात पाठवलं —हा एक भुलावा.
शत्रूचं लक्ष त्या दिशेने वळलं.

त्याच वेळी महाराजांनी मोजक्या मावळ्यांसह, मुसळधार पावसात आणि रात्रीच्या अंधारात विशाळगडाकडे वाट धरली.

पण शत्रूला लवकरच सुगावा लागला . पाठलाग सुरू झाला.
तेव्हा बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या मोजक्या मावळ्यांनी घोडखिंडीत प्राणपणाने जीवघेणी झुंज दिली.

हातातील प्रत्येक शस्त्र वापरून ते लढले — फक्त महाराजांना इच्छित स्थळी पोहचायला वेळ मिळावा म्हणून.
महाराज विशाळगडावर पोहोचल्याची खबर येईपर्यंत त्यांनी खिंड लढवली सोडली नाही.
बाजी प्रभूंनी आणि त्यांच्या मावळ्यांनी प्राण गमावले, पण महाराज वाचले.

महाराजांनी त्वरित प्रतिहल्ला केला नाही.
परिस्थितीचा आढावा घेतला, शक्ती गोळा केली आणि योग्य वेळ येईपर्यंत थांबले.
आणि मग, योग्य क्षणी, आपल्या अटींवर हल्ला केला.

हाच संयम आणि शौर्या च्या बळा वर त्यांनी  मराठा साम्राज्य उभं केलं.

का कधी कधी मागे सरकणं हाच खरा खेळ असतो

आजचा काळ ‘सतत काहीतरी करणं’ याची स्तुती करतो — जास्त काम, जास्त तास, झपाट्यानं निर्णय.
पण याचा परिणाम काय? —शारीरिक  आणि मानसिक थकवा, चुकीचे निर्णय, आणि  त्यामुळे मोठ्या संधी हातून जाणं.

खरे नेते जाणतात — कधी कधी थांबणं, मागे हटणं हाच पुढे जाण्याचा मार्ग असतो.

मग ते युद्ध असो, व्यवसायातील मोठा निर्णय, किंवा वैयक्तिक आव्हान —
एक विचारपूर्वक घेतलेला विराम पुढील निर्णयासाठी स्पष्टता देतो.

तुम्ही विचार न करता धावत आहात?
की थोडं थांबून पुढचं पाऊल आखत आहात?

आता रणनीतीचा एक प्रश्न तुमच्यासाठी

समजा, तुम्ही एका व्यवसायाचे नेतृत्व करत आहात.
एक नवा प्रतिस्पर्धी जोरात पुढे येतोय आणि तुमचे ग्राहक हिसकावून नेण्याचा प्रयत्न करतोय.

तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल?

लगेच प्रतिसाद देऊन पूर्ण ताकद लावून त्याच्या प्रत्येक हालचालीला उत्तर द्याल? की,
थोडं थांबून, त्याची रणनीती समजून घेऊन, दीर्घकालीन यशासाठी स्वतःची दिशा बदलाल?

अखेर कोण जिंकेल?
तुमचा विचार आमच्यासोबत शेअर करा.
सर्वोत्तम उत्तर पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध केली जातील.

थांबा—विचार करा—आणि मग पुढे जा

छत्रपती शिवाजी महाराजांचं पन्हाळ्याहून सुटणं  ही पळवाट नव्हती तर ती युक्ती होती — ‘एक भक्कम रणनीती होती.

आता तिच रणनीती प्रत्यक्ष अनुभवा —

The Maratha Escape at Mayurangan

Not just a stay—a journey into history. The Maratha Escape at Mayurangan is an immersive experience where you don’t just learn about strategy—you live it.

  • Crack the lost scrolls of Shahaji Raje in a thrilling code-breaking challenge.
  • Dine like a warrior with traditional Maratha-style meals.
  • Relive the grit and tactics of the Marathas through games, stories, and bonfire sessions.
  • Wake up to the view of Shivneri Fort, the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj.

Limited slots. Timed challenges. One chance to prove your strategy.

Will you take the challenge? Book your escape now.